---Advertisement---

तब्बल ६ वर्षानंतर आज सिंदखेड बस सेवा सुरू !

By team
On: October 17, 2025 10:24 AM
Follow Us:
---Advertisement---

तालुका दक्षिण सोलापूर :  श्री नागनाथ विधाते 

ग्रामपंचायत यांच्या प्रयत्नातून सिंदखेड येथे बस सेवा सुरु करण्यात आले. सिंदखेड या गावाला गेल्या सहा वर्षापासून एसटी बस सेवा बंद होती.आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड येथील ग्रामपंचायत यांच्या मार्गदर्शनाखाली यथार्थ प्रयत्नाने आज एसटी सेवा सिंदखेड या गावांना सुरळीत बस सेवा सुरु करण्यात आलेला आहे.

त्यानंतर गावातील प्रवासी आनंदमय झालेला आहे. त्यानिमित्त ग्रामपंचायत यांचं या प्रयत्नाला सिंदखेड येथील प्रवासी आभार मानत आहेत. या सुरळीत झालेल्या बस ची पूजा सिंदखेड येथील वेद.मडीवळया स्वामी,यांच्या हस्ते बस ची पूजा करण्यात आले. तसेच बस ड्रायव्हर व कंडक्टर यांचेही ग्रामस्थांनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ग्रामसेविका सुजाता हुमनाबादकर ,सरपंच काशीबाई गावडे,उपसरपंच राजेश रणधिरे, सदस्य मल्लम्मा स्वामी, भरमण्णा गावडे, मा. सरपंच रवींद्र इंगळे, मल्लेशी करके,सिद्धाराम मोकाशी,फिरोज पटेल,राहुल कंदले,जुबेर नागणसुरे, सूर्यकांत कोळी, तसेच अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आदी प्रवासी उपस्थित होते.तसेच गावातील बस चालू करण्यासाठी प्रयत्न करणारे ग्रामपंचायत उपसरपंच राजेश रणधिरे यांच्या प्रयत्नाला प्रवासी आभार मानत आहेत. तसेच मद्रे,आनंदनगर ताडा, सिंदखेड आदी गावातील प्रवासी आनंदमय झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!