ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…तर मी राजीनामा देण्यास तयार ; मंत्री मुंडेंचे वक्तव्य !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून अजित  पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत आले आहे तर दुसरीकडे मुंडे यांचे विरोधक त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागत आहे तर आता मंत्री मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

माझी नैतिकता ही माझ्या जनतेसोबत आहे. मात्र, माझ्या नैतिकतेनुसार मी दोषी. मी जर दोषी असेल तर दाखवून द्या, मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराड सोबत धनंजय मुंडे याचे संबंध आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. राजीनाम्याचा दबाव वाढत असतनाच मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. या दरम्यान त्यांनी केंद्री मंत्री पल्हाद जोशी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रत्रकारांशी संवाद साधला.

या प्रकरणात सुरुवातीपासूनच मला टार्गेट केले जात असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या संदर्भात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची माझी देखील मागणी असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी जर दोषी वाटत असेल तर राजीनामा मागावा. तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र, केवळ विषय काढून राजीनामा मागितला जात असेल तर काय बोलणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय हेच माझ्या राजीनामा मागू शकतात. त्यामुळे सर्व गोष्टी क्लियर राहायला पाहिजे, असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे.

गेले 51 दिवस या प्रकरणात ट्रायल चालू आहे. त्याचे टार्गेट मी आहे. मी पार्टीचा निक्षावंत कार्यकर्ता आहे. मी पार्टीचा स्टार प्रचारक म्हणून निवडणुकीच्या काळात टीका केल्या असतील. आणि टीका सहनही केल्या असतील. महायुतीच्या प्रचारासाठी आम्ही आमच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचार केला असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून आमदार सुरेश धस यांचा प्रचार केला असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तर निवडणुकीनंतर प्रचारातील मुद्दे नंतर विसरून जायचे असतात, असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे.

माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडली आहे, त्या घटनेबद्दल मी जे बोललो ते अतिशय प्रामाणिकपणे बोललो आहे. याबाबतीत मी कुठेच कोणताच दोष असल्याचे मला माझ्या नैतिकतेने वाटत नाही. त्यामुळे माझा दोष नैतिकतेने मला दाखवावा तर लागेल ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझे केवळ एवढेच म्हणणे असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!