---Advertisement---

कोरोना महामारीच्या काळात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे समाजकार्य !

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१८ : सध्याच्या संचारबंदीमुळे ज्यांचे हातावर पोट आहे. त्यांना पुनश्च एकदा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कोरोना पार्श्वभूमीवर अनेक गरजुंना प्राप्त परिस्थितीत न्यासाकडून अन्नदान सेवा व जयहिंद फुड यांच्या सहकार्याने अक्कलकोट शहर व परिसरातील निराधार व अत्यंत गरजू लोकांना एक वेळचे जेवण देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

दरम्यान याचा शुभारंभ रविवारी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करुन करण्यात आले.

यावेळी मराठा सेवा संघाचे ता.अध्यक्ष प्रविण घाटगे, शहाजी यादव, जयहिंद फुडचे अंकुश चौगुले, अशोक जाधव, योगेश पवार, आतिष पवार, हिरा बंदपट्टे, मुदई तांबोळी, आकाश चौगुले, महेश लिंबोळे, सोनु कांबळे, शिवा चौगुले, फहिम पिरजादे यांच्यासह वैभव मोरे, राहुल शिंदे, महांतेश स्वामी, गोविंद शिंदे, चंद्रकांत हिबारे, विकी पवार, सागर पवार, मलंग मकानदार, मल्लिकार्जुन गवळी, राजु झंपले, संभाजीराव पवार, अक्षय पवार, पप्पू वाकडे आदीजण उपस्थित होते.

★ अन्नदान सेवेकरिता

● अंकुश चौगुले : 9960662424,

● अशोक जाधव : 9403487898,

● योगेश पवार : 8208065494,

● हिरा बंदपट्टे : 8007114499,

● आतिश पवार : 7058327557

यांना संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!