ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मतदान व मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद

सोलापूर वृत्तसंस्था 

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार सोलापूर जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदान (20 नोव्हेंबर) व मतमोजणी (23 नोव्हेंबर) या दोन्ही दिवशी सोलापूर जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात बार्शी  तालुक्यातील वैराग, उत्तर सोलापूर तालुक्यातील  कोंडी,  नंदुर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग, शिंगडगाव,  मंद्रुप येथील  वडापूर, विंचूर, अक्कलकोट तालुक्यातील उडगी, चिक्केहळ्ळी, बोरगाव, सुलेरजवळगे, शावळ,  हन्नुर,  माढा  तालुक्यातील चांदज, मोहोळ तालुक्यातील  पाटकुल, शेटफळ, चिंचोलीकाटी, कोन्हेरी,  करमाळा तालुक्यातील नेरले, जिंती, कंदर, वाशिंबे, पंढरपूर तालुक्यातील  त. शेटफळ, सोनके, सरकोली, जळोली, पटवर्धन कुरोली, माळशिरस तालुक्यातील नातेपुते, महाळुंग, पाणीव तसेच सांगोला तालुक्यातील मेडशिंगी, किडेबिसरी, नराळे, हंगिरगे, हातीद, कडलास, नवी लोटेवाडी, अजनाळे, भोसे या ठिकाणचा बुधवार दि.20 नोव्हेंबर रोजी  मतदाना दिवशी  बाजार बंद राहतील.

तसेच  जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील  बार्शी, घारी, श्रीपत पिंपरी,  उत्तर सोलापूर तालुक्यातील  कळमन,  दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी, मंद्रुप येथील बरूर, कंदलगाव, औज, अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर, जेऊर, कर्जाह, शिरवळ, माढा तालुक्यातील  मोडनिंब, टाकळी टे, मोहोळ तालुक्यातील  पापरी, देवडी, सय्यद वरवडे, कोन्हेरी, करमाळा तालुक्यातील केत्तुर, पंढरपूर तालुक्यातील  बोहाळी, उंबरगांव, पुळूज, माळशिरस तालुक्यातील  वेळापूर, सांगोला  तालुक्यातील आलेगाव, वाटंबरे, मानेगांव, पाचेगांव (खुर्द),मंगळवेढा तालुक्यातील  लवंगी, अरळी,  नंदेश्वर, मरवडे या ठिकाणचा शनिवार  दि.23 नोव्हेंबर रोजी  मतमोजणी दिवशी  बाजार बंद राहतील.

नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण स्तरावर भरणा-या आठवडी बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने मतदानाच्या व मतमोजणीच्या दिवशी आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याचे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने मार्केट अँड फेअर ॲक्ट अधिनियम, 1862 चे कलम 5 (ग) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी  दि. 20 व 23 नोव्हेंबर रोजी  जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!