ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर: आई-बापासमोरच झाला २२ महिन्याच्या बालिकेचा रस्त्यावर मृत्यू !

सोलापूर : वृत्तसंस्था

अक्कलकोटवरून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन मोटरसायकलवरून गावाकडे परत निघालेल्या पती-पत्नीच्या मध्ये गाडीवर बसलेल्या २२ महिन्यांच्या बालिकेचा रस्त्यावर पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. मोहोळ येथील गायकवाड मंगल कार्यालयासमोर शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार दरम्यान ही घटना घडली. स्वामिनी अमोल चव्हाण (वय वर्ष २२ महिने) रा. कोरेगाव ता.लोणार जि.बुलढाणा असे मृत पावलेल्या बालिकेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल सुदाम चव्हाण (वय वर्ष ३२) रा. कोरेगाव ता.लोणार जि. बुलढाणा हे सध्या औढी ता.माणखटाव जि. सातारा येथील हॉटेलवर आचारी म्हणून काम करीत आहेत. दि.२६ फेब्रुवारी रोजी मोटरसायकल क्र. एम. एच.१२ व्ही. डब्ल्यू १५५८ यावर अक्कलकोट येथे दर्शन घेण्यासाठी गेले होते. देवदर्शन उरकून अक्कलकोट वरून शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार दरम्यान मोहोळ येथील गायकवाड मंगल कार्यालयासमोर पोहोचली. यावेळी हातातील पिण्याच्या पाण्याची बाटली पडल्याने उजव्या साईडला झुकुन बाटली पकडण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन ती रोडवर पडली होती. रोडवर पडल्याने मार लागून जखमी झाली होती.

मोहोळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अमोल सुदाम चव्हाण (वय वर्ष ३२) रा. कोरेगाव ता.लोणार जि. बुलढाणा यांनी या घटनेविषयी पोलिसात नोंद केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!