ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधूचा दुर्देवी मृत्यू !

सोलापूर  : वृत्तसंस्था

माळशिरस तालुक्यातील बाभूळगाव येथील लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नववधुला ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने प्राण सोडावा लागला. ही हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर हरिदास पराडे यांचा १३ मे रोजी घोटी (ता .माढा ) येतील जानकी बाळासाहेब गळगुंडे यांच्याशी मोठ्या दिमाखात विवाह सोहळा निरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात संपन्न झाला होता. लग्नानंतर नववधू सासरी आली. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक छातीत कळा येऊ लागल्याने तिला तात्काळ अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल येथे घेऊन जात असतानाच वाटेत नववधूवर काळाने झडप घातली. या अचानक झालेल्या मृत्युने सासर आणि माहेरच्या दोन्ही कुटुंबाने टाहो फोडला. मृत्यू झालेल्या जानकी हिच्यावर बाभुळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!