---Advertisement---

सोलापूर हादरले; प्रसिद्ध मुलतानी बेकरीचे मालक सुनील सदारंगानी यांची आत्महत्या

By team
On: February 6, 2026 1:54 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर  : वृत्तसंस्था

सोलापूर शहराला हादरवून टाकणारी दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली. एकेकाळी शहरात प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील सदारंगानी (वय 60) यांनी इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, यामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुनील सदारंगानी हे सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील पनाश अपार्टमेंट येथे गेले होते. तेथील जिन्याच्या सहाय्याने ते थेट इमारतीच्या 17 व्या मजल्यावर पोहोचले. काही काळ तेथे उभे राहून ते प्रार्थना करत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती मिळताच इमारतीच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना खाली आणले.

मात्र काही वेळानंतर ‘चावी वर राहिली आहे’ असे सांगून सदारंगानी पुन्हा वर गेले आणि 17 व्या मजल्यावरून खाली उडी घेत त्यांनी जीवन संपवले. उंचावरून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली असून, संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून, आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. सदारंगानी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, त्यांना कोणता मानसिक ताण किंवा अडचण होती का, याबाबत विविध अंगांनी चौकशी केली जात आहे.

सुनील सदारंगानी यांच्या अचानक जाण्याने सोलापूर शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!