मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

राज्यातील ८ महापालिकांमध्ये भाजपचा झेंडा; नागपूर–संभाजीनगरसह 6 शहरांत महापौर भाजपचे !

By team
On: February 6, 2026 1:45 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील 8 प्रमुख महापालिकांमध्ये आज महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये नागपूर व छत्रपती संभाजीनगरसह 6 महापालिकांत सत्ताधारी भाजपने महापौरपदावर आपला दावा मजबूत केला आहे. एका महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी ठरला असून, उर्वरित एका ठिकाणी महापौर निवडीची प्रक्रिया सुरू आहे.

राज्यातील जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशिक या महापालिकांमध्ये आज निवडणूक प्रक्रिया झाली. यापैकी सोलापूर, जळगाव व अहिल्यानगर येथे चुरशीच्या वाटणाऱ्या निवडणुका ऐनवेळी बिनविरोध पार पडल्या.

सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेना व एमआयएमच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने कोंड्याल यांचा मार्ग मोकळा झाला. जळगाव महापालिकेत भाजपच्या दीपमाला काळे यांची महापौरपदी, तर शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. दीपमाला काळे या जळगावच्या 17 व्या महापौर ठरल्या आहेत.

नागपूर महापालिकेत भाजपच्या नीता ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्नेहल ठाकरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. नीता ठाकरे यांना 104, तर स्नेहल ठाकरे यांना 36 मते मिळाली, तर 11 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली.

धुळे महापालिकेत सत्ताधारी महायुतीतच दुरंगी लढत झाली. येथे भाजपच्या मायादेवी परदेशी यांनी 50 मते मिळवत महापौरपद पटकावले. नांदेड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झाला असून, भाजपने 81 पैकी 45 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. येथे कविता मुळे यांची महापौर, तर दीपकसिंह रावत यांची उपमहापौरपदी निवड निश्चित झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत समीर राजूरकर महापौर, तर राजेंद्र जंजाळ उपमहापौर होणार असून, औपचारिक घोषणा बाकी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या शर्मिला बाबर यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित झाल्याची माहिती असून, तेथे निवड प्रक्रिया सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment