मुंबई : राज्यात नगरपालिका पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण काढण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे या पार्श्वभूमीवर तारखा देखील जाहीर केल्या असून आता सर्वांचे लक्ष आरक्षणाकडे लागले आहे.

राज्यातील २५ जिल्हा परिषद व २८४ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.१३ जुलै रोजी ही आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात येणार आहे तसेच पंचायत समिती साठी त्या त्या तहसीलदार कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येईल,असे स्पष्ट करण्यात आले आहे.





