---Advertisement---

संभाजीनगरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, दोन प्रवाशांचा मृत्यू

Follow Us:
---Advertisement---

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील वांगी फाट्याजवळ एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. गॅस सिलेंडर वाहतूक करणारी ट्रक आणि सिल्लोड-पाचोरा एसटी बसमध्ये भीषण टक्कर झाली. बसमध्ये ३० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. अपघातामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत.

अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांची मदत करत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!