---Advertisement---

प्रदेश भाजपच्या मुंबईतील कार्यालयाला आग

By team
On: April 22, 2024 10:27 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबईतील नरिमन पॉइंट येथील प्रदेश भाजप कार्यालयाला रविवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास मोठी लाग लागली. रविवारी सुट्टीच्या दिवशी कर्मचारी व येणाऱ्या-जाणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी – कमी असल्याने येथील किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली.

काही क्षणातच आग भडकली. कार्यालयात कागदपत्रे व फर्निचर असल्याने आगीने चांगलाच पेट घेतला. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कार्यालयात मोजकेच लोक असल्याने त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. यावेळी परिसरात काही वेळ धुराचे लोळ दिसत होते. अर्ध्या तासात वेळेवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. कार्यालयात लोकसभा निवडणुकीचे प्रचारसाहित्य होते. मात्र, यात नेमके कशाकशाचे नुकसान झाले, याची माहिती समोर आली नाही. पक्षाने याबाबत अधिकृत माहिती देणे टाळले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!