---Advertisement---

राज्य सरकार शेतकरी हितासाठी कायम तत्पर – उपमुख्यमंत्री

Follow Us:
---Advertisement---

मुंबई :  केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना राज्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषिमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.

शिष्टमंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, एस. व्ही. जाधव, अशोक ढवळे, नामदेव गावडे, सुभाष लोमटे, किशोर ढमाले, सीमा कुलकर्णी, सुभाष काकस्ते, उमेश देशमुख, शकील अस्मेद आदी मान्यवरांचा समावेश होता.

राज्यातील सरकार शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे हे सरकार कायम शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभे राहील. शेतकरी हिताचे पाऊल उचलण्यात सरकार मागे हटणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!