---Advertisement---

कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितली थेट शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याची तारीख ; त्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिले प्रत्युत्तर

Follow Us:
---Advertisement---

नागपूर : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याची थेट तारीख सांगितले आहेत. महाराष्ट्रातील असंवैधानिक सरकार येत्या १४ तारखेला कोसळणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केली आहे. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहेत.

येत्या १४ तारखेच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार कोसळणार असल्याचं वक्तव्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. मात्र, दोनवेळा बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्य सरकार यशस्वी झाले असून १४ फेब्रुवारीच्या निर्णयानंतर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास १८४ आमदार या सरकारमध्ये राहतील, असे दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे एवढच सांगितले नाही तर आणखी २० आमदार राज्य सरकारमध्ये सामील होणार असल्याचंही त्यांनी म्हंटले आहे. ते २० आमदार कोण याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच, पंकजा मुंडे यांच्या विरोधात विरोधकांनी षडयंत्र रचून त्यांना बदनाम करण्यासाठी एक टीम बीडमध्ये तयार केली असल्याचंही त्यांनी म्हंटले आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये असंतोष आहे. आगामी निवडणुकीत त्यांना उमेदवारही मिळणार नसून आपसात पायखेच होणार असल्याची टीका बावनकुळेंनी केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!