---Advertisement---

अक्कलकोट तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नागनळळी येथील के एस एम कनिष्ठ महाविद्यालयाचे यश

By team
On: December 17, 2025 2:31 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट (प्रतिनिधी) पंचायत समिती शिक्षण विभाग अक्कलकोट व ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 53 वे अक्कलकोट तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन चपळगाव येथे 15 व 16 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते.

तालुक्यातून माध्यमिक गटातून 108 वैज्ञानिक उपकरणांची मांडणी या प्रदर्शनात केली होती. के एस एम कनिष्ठ महाविद्यालय नागनळी येथील विद्यार्थी महेश टेंगळे, हरळय्या यशवंत, फडतरे ओंकार या विद्यार्थ्यांनी स्मार्ट ॲग्रीकल्चरल, कॅटल फार्म व बहुउपयोगी शेतीयंत्र या उपकरणाची निर्मिती केली आहे. या वैज्ञानिक उपकरणास माध्यमिक गटातून तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाले असून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

स्मार्ट ॲग्रीकल्चर, कॅटल फार्म व बहुउपयोगी शेतीयंत्र
यां प्रकल्पामुळे शेती व्यवस्थापन अधिक सुलभ, आधुनिक व कार्यक्षम होते. ESP32 +M या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हवामानाचे निरीक्षण करता येते. पाणीपुरवठा व सिंचन प्रणालीवर अचूक नियंत्रण ठेवता येते, त्यामुळे पाण्याची बचत होते. पशुपालनासाठी लागणारा वेळ, श्रम व खर्च कमी होतो. गोठ्यामध्ये पाळीव प्राण्यांच्या देखभालीसाठी स्वयंचलित व्यवस्थापन प्रणाली उपलब्ध आहे. संपूर्ण प्रणाली सौरऊर्जेवर कार्यरत असल्यामुळे वीज खर्चात बचत होते व पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते.

बहुउपयोगी शेतीयंत्राच्या मदतीने पीक व फळबागांवर औषध फवारणी करता येते. शेती, बाग व शालेय परिसरातील तण काढण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो. पेरणीसाठी टोकन यंत्राचा वापर करता येत असल्यामुळे मजुरीचा खर्च कमी होतो. हे सर्व कार्य मोबाईलद्वारे नियंत्रित करता येते. त्यामुळे हे उपकरण अनेक शेतीकामांसाठी उपयुक्त असून शेतकऱ्यांना आधुनिक, स्वयंपूर्ण आणि किफायतशीर शेती करण्यास मदत करते.

या विद्यार्थ्यांना प्राध्यापक रवींद्र नवले, अमोल पाटील, वशिम शेख, शुभांगी मिठारे व प्रयोगशाळा सहाय्यक शेख नूरुद्दीन यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव जावेद पटेल, प्राचार्य मुजावर आय.एम., मुख्याध्यापक शेख आर.जी. व प्रशालेतील शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!