ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बदलाच्या विकासाला साथ द्या ; कमळावर विश्वास ठेवा

शांभवी कल्याणशेट्टी यांचा प्रभाग ५ मध्ये मतदारांशी संवाद

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट शहरात झालेला बदल जनतेच्या आशीर्वादाने, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाने आणि भाजपच्या साथीने शक्य झाल्याचे प्रतिपादन आमदार कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांनी केले.बदल झाला आहे… बदल दिसतो आहे…आणि बदल जाणवतो आहे… अशा शब्दांत त्यांनी शहरातील विकासाची दिशा अधोरेखित केली. प्रभाग क्रमांक पाचमधील उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या.

सभेनंतर प्रभागातील गल्लीबोळातून पदयात्रा काढून नागरिकांना प्रत्यक्ष भेट देत कमळाच्या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. पुढे बोलताना शांभवी कल्याणशेट्टी म्हणाल्या की, अक्कलकोट शहराने नेहमीच भाजपला साथ दिली आहे, त्यामुळेच शहराचा विकास वेगाने झाला आहे. भाजपच्या विजयामुळे शहरात रस्ते, प्रकाशयोजना, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सुविधा यामध्ये लक्षणीय बदल दिसला असल्याचे त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना त्यांनी पाणीपुरवठ्याच्या कायमस्वरूपी उपाययोजनेबाबत माहिती दिली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून ७५ कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली असून त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः महिला वर्गाने
आता पाण्याची चिंता करू नये, कारण अनेक वर्षांपासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या योजनेमुळे सुटणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहरात अनेक महत्त्वाची विकासकामे सुरू आहेत आणि अजूनही बरीच कामे होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विकासाला साथ देण्याची वेळ आली आहे,असे सांगून शांभवी कल्याणशेट्टी यांनी प्रभागातील मतदारांना भाजपच्या कमळ चिन्हावर बटन दाबण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांना रिकॉर्ड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या सभेला गौरी कल्याणशेट्टी, उमेदवार रमेश कापसे, उमेदवार रेणुका राठोड, अनुप महाराज, स्वप्नील पुकाळे, मुन्ना राठोड, दयानंद दोड्याळे, ओंकार कापसे, नीलकंठ कापसे, समर्थ गोरे, प्रकाश टाके, वैजीनाथ मुकडे, युसुफ जमादार, मोहसिन बागवान, जलील बागवान आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!