---Advertisement---

जादूटोण्याच्या संशय : दोघांना जिवंत जाळले

By team
On: May 4, 2024 9:27 AM
Follow Us:
---Advertisement---

गडचिरोली : वृत्तसंस्था

एका घरात लागोपाठ होणाऱ्या मृत्युसत्रास जबाबदार धरून पुजारी म्हणून काम करणाऱ्या महिलेसह पुरुषास जिवंत जाळून ठार केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील बारसेवाडा येथे शुक्रवारी उघडकीस आली. पोलिसांनी १५ आरोपींना जेरबंद केले असून मृत महिलेच्या पतीसह मुलाचा आरोपींत समावेश आहे. जननी देवाजी तेलामी (५२), देवू कटयी आतलामी (५७, दोघे रा. बारसेवाडा) अशी मृतकांची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, एटापल्लीपासून १० किमीवर बारसेवाडा हे गाव आहे. येथील एका महिलेचा २ वर्षांपूर्वी गर्भपात झाला. त्यानंतर महिन्यापूर्वी याच कुटुंबातील एका महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. १ मे रोजी दीड वर्षाच्या मुलीचाही मृत्यू झाला. लागोपाठ मृत्यूने कुटुंब तर हादरलेच, पण गावालाही धक्का बसला. जननी व देवू हे दोघे जादूटोणा करत असल्याचा संशय कुटुंबास होता. यातून १ मे रोजी जननी व देवू यांना रात्री घरी जाऊन अमानुष मारहाण केली. त्यानंतर गावापासून एक किलोमीटर अंतरावरील नाल्यात नेऊन जिवंत जाळण्यात आले. यात दोघांचाही मृत्यू झाला. मयत जननी हिचा भाऊ शाहू मोहनंदा यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!