---Advertisement---

स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल : पुणे मनपाला ५ स्टार नामांकन

By team
On: January 12, 2024 9:26 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्र सरकारने गुरुवारी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ चा निकाल जाहीर केला. यावेळी देशातील स्वच्छ राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राला प्रथम, मध्य प्रदेशला द्वितीय तर छत्तीसगडला तृतीय क्रमांक मिळाला आहे.

गेल्यावेळी मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर होते.दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण २०२३ पुणे महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत १० वा क्रमांक आणि ५ स्टार नामांकन प्राप्त केले आहे.हा पुरस्कार आयुक्त विक्रम कुमार , अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार,उपायुक्त आशा राऊत आदींनी स्वीकारला. यापूर्वी पुणे महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत चमकदार कामगिरी केली होती.सातत्याने महापालिका यात आघाडीवर राहिली आहे देशात आणि राज्यात पुणे महापालिका याबाबतीत सतत चर्चेत राहिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने पुणे शहराला अधिकाधिक स्वच्छ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत,असे उपायुक्त आशा राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूर सातव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे. सूरतलाही इंदूरसह संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळाला.

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील सासवड प्रथम, छत्तीसगडचे पाटण द्वितीय आणि महाराष्ट्रातील लोणावळा तृतीय क्रमांकावर आहे.गंगा किनाऱ्यावरील स्वच्छ शहरांत वाराणसी पहिल्या तर प्रयागराज दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील भारत मंडपम : कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय शहर विकासमंत्री हरदीप पुरी यांनी या राज्यांच्या प्रतिनिधींचा गौरव केला. यावेळी एकूण ९५०० गुणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील महूला सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सेफ सिटी पुरस्कार चंदीगडला देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!