पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे येथील स्वारगेट बस डेपो मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. या प्रकरणात दत्तात्रय गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यांपासून ओळखत होते. दोघांमध्ये जे झाले ते संगनमताने झाले असून बलात्कार झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते दोघे एकाच बसमधून खाली उतरले, ते बस मधून कोठे गेले? याची माहिती घेण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या दोघांमध्ये पैशांचा वाद झाला होता. त्यानंतर दत्तात्रय गाडे पळून गेल नाही तर तो त्याच्या गावी गेला होता. मात्र गावाला पोलिस छावणीचे रूप आल्याने तो लपून बसला, अशी माहिती देखील दत्तात्रय गाडे च्या वकिलांनी न्यायलयात दिली आहे.
पुण्यात पार्क केलेल्या बसमध्ये 26 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडेला गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. यानंतर, त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी निखिल पिंगळे म्हणाले – शिरूर तहसील मधील गुणाट गावातून आरोपीला अटक करण्यात आली. तो उसाच्या शेतात लपला होता. यावेळी गावकऱ्यांनी आम्हाला मदत केली. आरोपी गावात असल्याचे गावकऱ्यांनीच सांगितले होते. रात्री त्याने एका घरातून पिण्याचे पाणी आणि अन्न मागितले. यावेळी लोकांनी त्याला ओळखले आणि पोलिसांना माहिती दिली.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोपीला रात्री 1:10 वाजता गुणाट गावातून अटक करण्यात आली. या प्ररकणी एका विशेष वकिलाची नियुक्ती केली जाईल. आम्ही केस लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. बलात्कारानंतर तो भाजीपाल्याच्या गाडीत बसून गावात गेला बलात्कार केल्यानंतर, आरोपी पुण्याहून भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये लपून त्याच्या गावी पळून गेला. घरी पोहोचल्यावर त्याने कपडे आणि बूट बदलले. यानंतर तो घरातूनही निघून गेला. पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली होती की आरोपी गावातीलच उसाच्या शेतात लपून बसला असावा. पोलिस ड्रोन आणि स्निफर डॉगच्या मदतीने त्याचा शोध घेत होते. आरोपीला पकडण्यासाठी 13 पोलिस पथके तयार करण्यात आली होती.