---Advertisement---

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका घरोघरी पोहोचवा, अक्कलकोटमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट,दि.२८ : पक्ष वाढविण्यासाठी स्थानिक लोकांच्या समस्या सोडवणे महत्वाचे आहे त्यानंतर पक्षाची भूमिका आणि धोरण हे प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक अभिषेक आव्हाड यांनी केले.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष निरीक्षक अभिषेक आव्हाड यांनी अक्कलकोटमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पहिली बैठक घेतली.

या बैठकीमध्ये पक्ष वाढी संदर्भात काही कानमंत्र त्यांनी युवा कार्यकर्त्यांना दिला. जिल्हा परिषद गट प्रमाणे उपाध्यक्ष, सरचिटणीस व सचिव तसेच अक्कलकोट शहरामध्ये वार्ड प्रमाणे अध्यक्ष निवडीच्या सूचना त्यांनी दिल्या. युवकांचे जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवले जातील याकडे लक्ष द्यावे, दर पंधरा दिवसांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटांमध्ये मिटींगचे आयोजन करून स्थानिक लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, पक्षाची भूमिका धोरण प्रत्येक घरात घरामध्ये पोहोचवण्याच्या सूचना दिल्या.

या कार्यक्रमास शहराध्यक्ष मनोज निकम, अविराज सिद्धे, श्रीशैल चितली, वैभव मोरे, समर्थ तोवर, महादेव पवार, प्रमोद सोमवंशी, धनंजय मचाले, जाकीर तांबोळी,  गणेश राऊत, प्रदीप सोमवंशी, कुणाल सुरवसे, स्वराज्य घाडगे, पवन पाटील,  हर्षद मोरे, प्रदीप मोरे, संकेत पवार, लक्ष्मण काळे, चैतन लिंबीतोटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर उर्फ बंटी पाटील व शहराध्यक्ष आकाश कलशेट्टी यांनी केले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!