---Advertisement---

ठाकरे गट व भाजप आमने-सामने : राणेंच्या गाडीवर दगडफेक

By team
On: February 17, 2024 9:17 AM
Follow Us:
---Advertisement---

रत्नागिरी : वृत्तसंस्था

चिपळूण येथे माजी खासदार नीलेश राणे यांच्या गाडीवर चिपळुणात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे चिपळुणात जोरदार राडा झाला असून, राणे आणि जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. यादरम्यान सात ते आठ कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी नीलेश राणे गुहागरकडे जाण्यासाठी निघाले होते. राणे यांच्या गाडीसह सर्व ताफा आमदार जाधव यांच्या चिपळुणातील कार्यालयासमोरून जात असताना अचानक त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मोठा जमाव जमताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आमदार जाधव यांनी अलीकडेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती, तर राणेंनीही त्यांना इशारा दिला होता

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!