मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील ठाकरे गट व भाजपचे नेते आ.नितेश राणे यांच्यामध्ये गेल्या काही वर्षापासून वाक्ययुद्ध सुरु असतांना पुन्हा एकदा आ.राणे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढण्यावर ठाम आहे. याआधीही आम्ही 23 जागांवर लढलो आहे, काँग्रेसलाच शून्यापासून सुरूवात करायची आहे, असा टोला खासदार राऊत यांनी मारला. त्यावर जागावाटपाची चर्चा हायकमांडसोबतच होईल असे वडेट्टीवार यांनी उत्तर दिले आहे. ठाकरे गटाच्या 23 जागांच्या मागणीची नीतेश राणेंनी खिल्ली उडवली आहे.
आ.नीतेश राणे म्हणाले, २२ तारखेचा अयोध्येचा कार्यक्रम मंदिर समितीने असंख्य साधू संतांनी एकत्र बसून त्या पवित्र ठिकाणी कोणी जावे, कुणी पूजा अर्चा करावी, कोणी रामाचे दर्शन घ्यावे हे समितीने ठरवले आहे. त्याला भाजपचा कार्यक्रम म्हणून परत एकदा संजय राऊतने आपल्या मालकाची हिंदू द्वेषी भूमिका दाखवली आहे. तू जर वारंवार आमच्या हिंदू समाजाचा अपमान केला तर मी महाराष्ट्र सरकारला सांगेन असलेले त्याचे संरक्षण काढा आणि याला हिंदूंच्या हवाले करा, हा परत याच्या दोन पायावर घरी जाणार नाही याची काळजी हिंदू समाज आणि कार्यकर्ते निश्चितपणे घेतील, असा इशारा देखील नीतेश राणेंनी दिला आहे.