---Advertisement---

विरोधकांच्या इंजिनमध्ये परिवारालाच जागा ; फडणवीस

By team
On: April 26, 2024 9:41 AM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : वृत्तसंस्था

पंतप्रधान मोदी हे युतीचे इंजिन आहेत. मोदींच्या रेल्वेत शेतकरी, शेतमजूर, महिला अल्पसंख्याक, भटके विमुक्त, ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे. परंतु विरोधकांच्या रेल्वेला प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजून घेत असून त्यांच्या इंजिनमध्ये फक्त त्यांच्याच परिवाराला जागा आहे, अशी टीका राज्याचे फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

जळगाव जिल्ह्यातील स्मिता वाघ व रक्षा खडसे या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोजित सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, सबका साथ सबका विकासामुळे भाजपची विकासाची गाडी पुढे जात आहे. मात्र, तिकडे विरोधकांची काय अवस्था आहे? राहुल गांधी म्हणतात, मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे. त्यांच्या गाडीला ते सर्वजण इंजिन समजून घेतात; परंतु त्यांच्या गाडीत सामान्य माणसाला बसायला जागा असते का? शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंना जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या गाडीत फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे. राहुल गांधींच्या गाडीत प्रियंका गांधींनाच जागा असून त्यांच्या रेल्वेमध्ये केवळ त्यांच्या परिवाराकरिता जागा आहे. सामान्य माणसाकरता जागा नाहीये. त्यांच्याकरिता त्यांचा परिवाराच संपुर्ण दुनिया आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांच्याकरिता संपूर्ण भारत त्यांचा परिवार आहे. त्यांच्या इंजिनची अवस्था कशी आहे? शरद पवार बारामतीकडे ओढतात. उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात, स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतात. ममता वेगळीकडे ओढतात, त्यामुळे त्यांची गाडी जागेवरून हलत नाही, अशी अवस्था त्यांची झाली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!