---Advertisement---

टेम्पो भरून पैसे पाठविले असावे ; राहुल गांधी

By team
On: May 9, 2024 9:22 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अदानी, अंबानी यांनी काँग्रेसला टेम्पो भरून पैसे पाठविले असावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे असेल तर त्यांनी सीबीआय, ईडीमार्फत चौकशी करावी, असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी दिले.

राहुल गांधी म्हणाले, उद्योगपती पैसे पाठवितात या वैयक्तिक अनुभवावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केले असावे. मोदी यांनी या दोन उद्योगपतींना जे पैसे दिले आहेत, ती रक्कम आम्ही जनतेला योजनांच्या माध्यमातून परत देणार आहोत. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या टेम्पोचे चालक व सहाय्यक कोण आहेत याची देशाला माहिती आहे. यावेळी प्रथमच तुम्ही जाहीरपणे दोघांबद्दल बोलला. हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? असा सवालही राहुल यांनी केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!