नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार यांच्या सरकारचे हिवाळी अधिवेशण नागपूर येथे सुरु असून आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पीकविम्याच्या मुद्यावरून सभागृहात सरकारला चांगलेच धारेवर धरले. पीकविम्याच्या मुद्यावर सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. पण वस्तुस्थिती पूर्णतः वेगळी आहे. पीकविमा कंपन्या स्वतःचे उखळ पांढरे करून घेवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. सरकारला या प्रकरणी स्वतःची लाज वाटली पाहिजे, असे ते म्हणाले.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी शेतकरी प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व त्यांना मिळालेल्या मदतीवरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले. विजय वडेट्टीवार म्हणाले की, पीकविम्याच्या मुद्द्यावर सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. पण वास्तव वेगळे आहे. पीकविमा कंपन्यांना शेतकरी हिस्सा, राज्य व केंद्रीय निधी यातून 8615 कोटी रूपये मिळाले. पण त्यातून त्यांनी शेतकऱ्यांना अघे 1489 कोटी रुपयांचे वाटप केले. अद्याप 732 कोटी रुपयांचे वाटप होणे बाकी आहे. शेतकऱ्यांना केवळ 2121 कोटी मिळणार आणि उर्वरित 6 हजार कोटींचा फायदा कंपन्यांना होणार. शेतकऱ्यांना 1-2 रुपयांत विमा वाटता. सरकारला लाट वाटली पाहिजे, असे ते म्हणाले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, गत काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पण त्या तुलनेत पंचनामे झाले नाही. सरकार या प्रकरणी प्रचंड उदासीन आहे. तब्बल 6 लाख 36 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. वारंवार होणाऱ्या या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना सरकार मात्र त्यांना दिलासा देण्यात कमी पडत आहे.