ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्ह्यात उत्पादन विभागाचे धाडसत्र सुरूच ; आठ मद्यपीना अटक !

सोलापूर : प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जिल्ह्यात धाब्यांवर टाकलेल्या धाडीत ४ धाबा चालकांसह आठ मद्यपी ग्राहकांना अटक केली असून, बुधवारी न्यायालयाने त्यांना १ लाख १२ हजारांचा दंड ठोठावला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २८ नोव्हेंबर रोजी राबविलेल्या मोहिमेत विभागाकडून चार गुन्हे नोंदविण्यात आले. पंढरपूरचे निरिक्षक किरण बिरादार यांच्या पथकाने सायंकाळी ८ च्या सुमारास पेनूर येथील हॉटेल रॉयल या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात धाबा मालक युवराज नागनाथ कांबळे याच्यासह ग्राहक गणेश संजय त्रिंबके व काल्कु डोला कुर्मी यांना ताब्यात घेतले. बुधवारी आरोपींना मोहोळ कोर्टात हजर केला असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महाळणकर यांनी धाबा मालकास पंचवीस हजार व ग्राहकास प्रत्येकी एक हजार दंड ठोठावला. अकलूजचे दुय्यम निरिक्षक राजेंद्र वाकडे यांच्या पथकाने खुडूस येथील हॉटेल निसर्ग या धाब्यावरुन मालक सचिन हनुमंत कांबळे व मद्यपी ग्राहक सागर रमेश पिसे, देविदास श्रीमंत ठवरे व रामदास भगवान चव्हाण यांना अटक केली. न्यायालयाने धाबा मालकास पंचवीस हजार व ग्राहकास प्रत्येकी एक हजार दंड ठोठावला. दुय्यम निरिक्षक अक्षय भरते यांच्या पथकाने कुंभारी येथील हॉटेल झंकार येथे धाड टाकली असता धाबा मालक रामू दत्तात्रय कोळी व मद्यपी ग्राहक सोमनाथ दत्ता कोळी यांना केले. न्यायालयाने धाबा मालकास पंचवीस हजार व ग्राहकास एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. अन्य एका कारवाईत निरिक्षक सदानंद मस्करे यांनी विडीघरकुल कुंभारी परिसरात हॉटेल गौरी या ठिकाणी छापा टाकून हॉटेल मालक ओंकार धोंडिबा अंजिखाने व मद्यपी ग्राहक रोहित राजेंद्र मत्ते व श्रीकांत विष्णु रापोल यांना ताब्यात घेवून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने हॉटेल चालकास प्रत्येकी २५ हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावला. या चारही कारवाईत एकूण एक लाख बारा हजारांचा दंड आरोपींकडून शासनजमा करुन घेतला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!