ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवपुरीच्या अग्निहोत्रामधून संपूर्ण जगाला शांततेचा संदेश

सरसंघचालक मोहन भागवत यांची शिवपुरीला सदिच्छा भेट

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

शिवपुरीच्या अग्निहोत्रामधून संपूर्ण जगाला शांततेचा संदेश मिळतो.हे कार्य वैश्विक आहे. त्यामुळे यापुढेही वर्षानुवर्ष ते चिरकाल टिकेल.अग्निहोत्राचा अंगीकार केल्यास जीवनात समृद्धीचे पर्व येईल,असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

सोमवारी,भागवत हे खास शिवपुरीच्या अग्निहोत्राची माहिती घेण्यासाठी आश्रमाला सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी स्नेहभोजनाचाही आस्वाद घेतला.प्रारंभी विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले त्यांचे संस्थेच्यावतीने स्वागत केले.डॉ.भागवत यांचे सकाळी साडे दहाच्या सुमारास शिवपूरीत आगमन झाले.यावेळी डॉ.राजीमवाले महाराज यांच्यासह डॉ. गिरीजा राजीमवाले,देवयानी राजीमवाले, देव राजीमवाले व परिवार उपस्थित होता.प्रारंभी व्याहृति होम करून परमसद्गुरू गजानन महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि तसेच शिवपुरी येथील श्री शिवानंद योगीन्द्र महाराज,भगवती सोनामाता, देवदेवेश्वर भगवान परशुराम मंदिरांचे दर्शन घेऊन डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले महाराज यांच्या सोबत जागतिक पातळीवर मानव कल्याणकारी अग्निहोत्र आणि सनातन धर्म या विषयावर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी त्यांनी अग्निहोत्र केले.तसे गोळवलकर गुरुजीपासून शिवपुरीचा संबंध आहे,असे डॉ.राजीमवाले यांनी माहिती सांगताना त्यांनी आनंद व्यक्त करत परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या कार्याचे खूप कौतुक केले.यावेळी सेक्रेटरी अण्णा वाले,सुधीर कुलकर्णी, सिद्धार्थ आपटे, वक्रतुंड रंगाबादकर,डॉ.गणेश थिटे,रवी जोशी,संतोष वगाले,चेतन जाधव, धनंजय वाळुंजकर, सुरेंद्र तेलंग, पवन कुलकर्णी, पद्यनाभ गुरुजी,योगेश जोशी गुरुजी आदिंसह शिवपुरी येथील कर्मचारी उपस्थित होते.

सरसंघचालकांच्या दौऱ्याबद्दल समाधान
शिवपुरी अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार तर संपूर्ण जगभर सुरूच आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी खास शिवपुरीसाठी वेळ काढून इथे येऊन अग्निहोत्राची माहिती जाणून घेतली आणि याच्या मागचे विज्ञान जाणून घेतले.याबद्दल मला खूप समाधान वाटले.
डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले,अध्यक्ष विश्व फाउंडेशन

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!