ध्यास विश्वसार्ह बातमीचा

थंडीची चाहूल वाढली : बाजारात सुक्या मेव्याला मोठी मागणी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरातील विविध राज्यातील बदलते हवामान असता. गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलीच घट होत असून थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे आरोग्य संवर्धनासाठी पौष्टिक मेथी लाडूसह सुका मेवा अर्थात ड्रायफ्रुट्सला मागणी वाढली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत अंजीर, काजूच्या दरात वाढ झाली आहे. पिस्तासह बदाम, जर्दाळूच्या दरात घसरण झाली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

यंदा पावसाळा लांबल्याने थंडी सुरू होण्यास विलंब झाला. मात्र, गेल्या काही दिवसांत तापमानात घट होत आहे. तर थंडीची चाहूल लागली असून थंडीपासून बचाव करताना शरीरातील उष्मा वाढीस लागण्यासाठी ड्रायफ्रुट्स परिणामकारक ठरतात. त्यामुळे आरोग्य संवर्धनासाठी लाभधारक ठरणाऱ्या या पदार्थांना मागणी वाढली आहे. त्यामुळे एपीएमसीमध्ये ड्रायफ्रुट्स खेरदी करण्याकडे रेचलेल वाढली आहे. ऊर्जा निर्माण करणाऱ्या मेथीचे तयार लाडू, सुका मेव्याचे लाडू, बदाम, काजू, अक्रोड, जर्दाळू, खोबरे, खारीक, डिंक, गोडंबी, पिस्ता, अंजीर, मेथी दाणा आदींना विशेष मागणी असल्याचे व्यापारी सुरेंद्र पटेल यांनी सांगितले. मेथी तसेच डिंकाचे लाडूचे भाव स्थिर असून ६०० रुपये किलो या दराने विक्री होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बदामचे भाव घसरले असून काजू, अंजीरच्या दरात वाढ झाली आहे. तर खोबरेच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. खारीकच्या दरातदेखील घसरण झाली आहे. जर्दाळूसह अन्य काही मालाचे भाव काहीसे वधारले आहे. यासह मेथी दाणा १२० रुपये किलो, खसखस २४०० रुपये किलो, काळे मनुके ६०० ते ७०० रुपये, लाल मनुके ९०० ते १००० रुपये थंडीची चाहूल लागल्यापासून पौष्टिक लाडूसह अन्य सुका मेव्याची मागणी वाढल्याचे नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!