---Advertisement---

थिएटर बुक करतो , ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपट फडणवीसांनी पाहावा !

By team
On: April 1, 2024 9:15 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राहुल गांधी जर ‘सावरकर’ चित्रपट पाहायला येणार असतील तर मी अख्खे थिएटर बुक करेन, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या उपरोधिक टीकेला ‘देवेंद्र फडणवीस यांनीच गांधी विचारांवरील ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट पहावा, त्यांच्यासाठी थिएटर बुक करतो, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

रविवारी टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना पटोले बोलत होते. यावेळी पटोले म्हणाले, मोदींवरचा सिनेमा फ्लॉप झाला. नितीन गडकरींवरील हायवे मॅन सिनेमा फ्लॉप झाला. गोडसेवरील चित्रपट फ्लॉप झाला आणि सावरकर चित्रपटही फ्लॉप झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट पहावा, गांधी विचारांसाठी फडणवीसांनी हा चित्रपट पहावा, त्यांच्यासाठी थिएटर बुक करतो, असे आवाहन पटोले यांनी यावेळी केले. राहुल गांधी यांच्याशी तुलना करू नका राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून देशाच्या जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली आहे. टिंगलटवाळी करण्यापेक्षा कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्या व जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरही लक्ष द्या, असेही पटोले यावेळी म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!