नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात तब्बल तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची वर्णी लागल्याने सर्वच विरोधक पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका करीत असतात नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘संसदेत गर्जतो शिवनेरीचा छावा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर बोलत होते.
2027 ला एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी असतील असा मोठा दावा काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी केला आहे. तसेच यावेळी बोलतांना कुमार केतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. ”देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 2027 ला संपेल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतील की आता मी राष्ट्रपती होतो. माझी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मत मोजण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे थोड्याशा मताने समजा ते निवडून आले आणि 2027 ला नरेंद्र मोदी राष्ट्रपती झाले. त्यानंतर ते 2032 पर्यंत राष्ट्रपती असतील. मग 2029 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाची जरी सत्ता आली तरी नरेंद्र मोदी राष्ट्रपती असतील. त्यामुळे ते काहीही करु शकणार नाहीत. कारण नरेंद्र मोदी राष्ट्रपती असतील. राष्ट्रपती प्रत्येक गोष्ट तुम्हाला आडऊ शकतात”, असे मत कुमार केतकर यांनी व्यक्त केले आहे.
तसेच पुढे बोलतांना त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोनच इच्छा आहेत. नरेंद्र मोदी यांना हिंदु राष्ट्रामध्ये फारसा रस नाही. हिंदु राष्ट्र हवा आहे, पण हिंदु राष्ट्राची नैपत्य रचना करायची. मात्र, नरेंद्र मोदींचा जीव हा फक्त सत्तेमध्ये अडकलेला आहे. ते सत्तेत राहण्यासाठी ते जे शक्य असेल ते करतात. मग राजकीय पक्ष फोडण्यापासून सर्वच”, अशी टीका कुमार केतकर यांनी केली.