मुंबई : वृत्तसंस्था
देशातील अनेक पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहे. तर अनेक विरोधक भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत आहे. सध्या राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल करीत पंतप्रधान मोदींना देखील टार्गेट केले आहे.
खा.संजय राऊत म्हणाले कि, पंडित नेहरूंच्या विरोधात केलेली वक्तव्य हे पंडित नेहरूंचे यश आहे. त्यांच्या मृत्यूला 60 वर्ष झाली, पण गेल्या 10 वर्षांपासून मोदी त्यांच्या नावाचा जप करत आहेत. मोदी प्रधानमंत्री पदावरून दूर होतील, तेव्हा त्यांचे स्मरण कोणालाही राहणार नाही. दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहर पटेल यांच्यावर भंडारा लोकसभा मतदारसंघातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्याची जबाबदारी होती, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याच प्रफुल्ल पटेल यांना भाजपसोबत घेतले आहे, असे म्हणत भाजपने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाच्या केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
संजय राऊत म्हणाले की, भाजपला काँग्रेसचे , मविआचे आव्हान आहे, भीती आहे, हे स्पष्ट दिसत आहे. तुम्ही स्वत:च्या बळावर 400 जागा मिळवणार आहात ना, मग गेल्या दहा वर्षांपासून तुम्ही सातत्याने काँग्रेसवर टीका का करत आहात. 50-60 वर्षांपूर्वीचा इतिहास तोडून-मोडून का सांगताय, असा सवाल राऊत यांनी विचारला. प्रधानमंत्र्यांच्या भाषणात मणिपूरचा उल्लेख का नाही, काश्मिरी पंडितांविषयी काहीच बोलले नाहीत, लडाखमध्ये जे चीन घुसला आहे, त्यावर भूमिका स्पष्ट केली नाही. फक्त पंडित नेहरू आणि काँग्रेसचे भजन करत आहेत इतकी वर्ष, त्यावरूनच त्यांना काँग्रेसची भीती वाटते हे स्पष्ट होते, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सध्या विदर्भात चाय पे चर्चा करत फिरत आहेत. ती चर्चा करण्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्रातल्या गुंडगिरीवर चाय पे चर्चा करावी. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे, रोज त्यांच्या पक्षात गुंडांना प्रवेश देत आहेत. रोज मी त्या संदर्भातला एक फोटो लोकांसमोर आणतोय. आजही टाकला आहे.