ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…तर राजीनामा घेतील ; मंत्री मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंचे भाष्य !

नाशिक : वृत्तसंस्था

गेल्या दोन महिन्यापासून बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरण मोठे चर्चेत असताना या खुनातील संशयित आरोपी मंत्री मुंडे यांच्या जवळचे असल्याचा आरोप विरोधक करीत असतांना देखील मंत्री मुंडे यांचा सरकार राजीनामा घेत नसल्याची चर्चा सुरु असतांना आता पहिल्यांदा मंत्री पंकजा मुंडे यांनी यावर भाष्य केले आहे.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाले कि, धनंजय मुंडे यांच्यासंबंधी निर्णय माझ्या स्तरावर नसून, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांना जर ते दोषी वाटले आणि राजीनामा घेण्याची आवश्यक वाटली, तर ते घेतील. सध्या त्यांना गरज वाटत नसल्याने राजीनामा घेतला नसावा असे मत मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत, ते दोषींवर नक्कीच कारवाई करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मंत्री पंकजा मुंडे रविवारी (दि. ९) नाशिक जिल्हा दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पर्यावरण खात्याची जबाबदारी माझ्यावर स्वामींच्या कृपेने पडली आहे. मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही, माझ्या बाबांचा गणपती दूध पित नव्हता. मी श्रद्धाळू आहे. स्वामींची कृपा, महादेवाचे वाहन नंदी, ज्या देवांचा विचार करतो प्रत्येक देवामागे प्राणी असतात. विज्ञानाशी सांगड घातली पाहिजे. सोन्याच्या मोहरा पुढच्या पिढीसाठी कामी येणार नाहीत. तहान लागल्यावर पाणीच लागेल. प्रयागराजमध्ये कुंभमेळा आहे. त्या ठिकाणी अनेक तपस्वी आहेत आधी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तिथे जायचे, आता कुंभमेळा पाहायला जातात. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची जबाबदारी राज्यावर आहे. मला गोपीनाथ मुंडे यांचा वारसा मिळाला म्हणून लोकांनी स्वीकारले. त्यांनी पक्ष उभा केला. कुंभमेळ्यात आपल्याला चांगले काम करायचे आहे. गोमातेचे संवर्धन करायचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!