---Advertisement---

हा तर भुजबळांचा धंदा आहे ; जरांगे पाटलांची टीका

By team
On: April 9, 2024 11:13 AM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील नेत्यांनी आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करण्यासाठी अनेक ठिकाणी जाहीर सभाच धुमाकूळ सुरु झाला असून त्यात राज्यात गेल्या काही वर्षापासून सुरु असलेल्या मराठा समजाच्या आंदोलनावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी आता मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

जरांगे पाटील सोमवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह महाविकास आघाडी आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. निवडणुकीला उभे राहून स्वतः मोठे होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा भुजबळांचा धंदा आहे अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच आता राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला आम्ही पाडणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

छगन भुजबळ यांच्यावर जरांगे यांनी पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे. ”निवडणुकीला उभे राहून स्वतः मोठे होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा भुजबळांचा धंदा आहे. ओबीसीमध्ये आमच्या नोंदी सापडल्या आहेत. भुजबळ आणखी किती दिवस खोटं बोलणार आहेत. तुम्ही विरोध करत राहा, मी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेऊनच दाखवणार”, असा इशारा मनोज जरांगेनी भुजबळांना दिला आहे.

यावेळी मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून मराठा समाजाची फसवणूक झाल्याचे म्हंटले आहे. ते म्हणाले की, सर्व जण सारखेच आहेत. तिघांनी मिळून षड्यंत्र केले. किती दिवस मराठ्यांची फसवणूक करणार आहात. मागच्या काळात आमचा महाविकास आघाडीने कार्यक्रम केला आणि आताही महायुतीच्या सरकारने तेच केले आहे. या दोघांना निवडणुकीत पाडा”, असे मनोज जरांगे पाटलांनी म्हंटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!