---Advertisement---

बार्शी-सोलापूर रोडवर भीषण अपघातात तीन जखमी !

By team
On: November 28, 2023 9:24 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच बार्शी-सोलापूर रोडवरील सौंदरे गावाजवळ बस आणि कारची भीषण धडक बसली असून, या अपघातात कारमधील तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी क्र.क्र. एमएच १३ सीएस ४९८० व बस क्र. एमएच १४ बीटी ३४८५ या वाहनांत भीषण धडक झाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस प्रशासन, ग्रामस्थ आणि भगवंत सेना दलाच्या स्वयंसेवकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. शिवसेनेचे दीपक आंधळकर यांनीही माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात हातभार लावला. कार सोलापूरहून बार्शीकडे येत होती, तर बस बार्शीतून सोलापूरकडे जात असताना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!