---Advertisement---

अक्कलकोटमध्ये थरार : दोन वर्षाच्या चिमुकलीच्या अंगावरून गेली बस

By team
On: May 3, 2024 10:41 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

येथील पंचायत समिती समोर गुरूवार, दि.२ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात घडला. दोन वर्षाच्या चिमुकल्या मुलीच्या अंगावरून बस गेल्याने ती जागेवर ठार झाली. झारा जुबेर पठाण (वय २ वर्षे, रा. कालीका नगर, अक्कलकोट) असे मयत मुलीचे नाव आहे.

संशयित आरोपी बसचालक अमोगसिध्द ख्याडे (रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर, हल्ली खासबाग, अक्कलकोट) याच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद अमीरखान युसूफ पठाण (वय-२२, रा.समतानगर, अक्कलकोट) यांनी दिली. अपघातामध्ये फिर्यादी व त्याचा भाऊ साद पठाण (दोघे रा. समता नगर, अक्कलकोट) हे जखमी झाले.

सविस्तर वृत्त असे कि, गुरूवार, दि.२ मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती अक्कलकोट समोरील रोडवर एस.टी. बस (क्र. एम.एच. १४ के.क्यु. ०८२९) वरील चालक सिध्दाराम अमोगसिध्द ख्याडे याने त्याच्या ताब्यातील एस.टी. बस भरधाव वेगात चालवून फिर्यादीची स्कूटी (क्र.एम.एच.१३ डी.के. १३९६) हिस पाठीमागून कट मारुन फिर्यादी व त्याचा भाऊ साद पठाण, त्याचे मामाची मुलगी झारा जुबेर पठाण (वय २) तिघांना जखमी केले. यातील झारा जुबेर पठाण हिच्या अंगावरुन बस गेली. यात तिचा उपचारापूर्वीच ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे दुपारी १ वाजता मृत्यू झाला. तिच्या मृत्युस कारणीभूत ठरला म्हणून एस.टी. बस चालक सिध्दाराम ख्याडे याचे विरूध्द तक्रार दिली. अधिक तपास सपोफौ राजु राठोड हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!