ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उद्या आकाशवाणी सोलापूर केंद्राचा ३९वा वर्धापन दिन

सोलापूर : प्रतिनिधी 

आकाशवाणी सोलापूर केंद्राचा ३९ वा वर्धापन दिन उद्या (शुक्रवारी) साजरा होत आहे. त्या निमित्ताने सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत आकाशवाणीच्या मुख्य इमारतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आकाशवाणीच्या वतीने प्रसारण अधिकारी, सुजित बनसोडे यांनी केले आहे.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून उद्या संध्याकाळी ६.३० वाजता रमा कुलकर्णी यांची संगीत मैफिल होणार आहे. यासोबतच रेडिओ फीचर, डॉक्युमेंटरी, नभोनाट्य, काव्यवाचन, अभिवाचन, रेडिओ जिंगल्स, पब्लिक अनाउन्समेंट अशा स्पर्धा कार्यक्रम विभागाच्या वतीने घेण्यात आल्या होत्या. त्याचे बक्षीस वितरण देखील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात होणार आहे. याप्रसंगी आकाशवाणीचे अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांची उपस्थिती राहणार आहे.

भाषा, कला, साहित्य, संगीत यांच्या सोबतच विविध वयोगटांनुसार सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम दिवसेंदिवस लोकाभिमुख होत आहेत. ज्ञानवर्धक कार्यक्रमांमुळे तरुणाई जास्तीत जास्त आकाशवाणी ऐकण्यासाठी उत्सुक आहे. शैक्षणिक कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन मिळते
स्पर्धा परीक्षांसाठी लाभदायक आणि विशेष कार्यक्रम, मनोरंजनपर सुनो तराने क्विझ के बहाने हा कार्यक्रम श्रोत्याचा आवडीचा आहे. दिनविशेषनिहाय विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील कार्यक्रम कृषी व ग्रामीण विकास, शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला ,हवामान अंदाज आणि शेती तंत्रज्ञान ,शेती आधारित व्यवसाय आणि शासकीय योजना या विषयावरील कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात.
आरोग्य आणि जीवनशैली, आयुर्वेद, योग आणि मानसिक आरोग्य ,आहार आणि पोषणविषयक माहिती विचारपुष्प सारख्या वैचारिक कार्यक्रमातून श्रोत्यांना मिळते. आरोग्य जागर सारख्या कार्य्रक्रमातून विविध आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय समजतात .लोक वेळीच जागे होतात.रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा हा विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून बहुविध लोकांपर्यंत पोहोचतो. इतिहास आणि संस्कृती ,भाषाशास्त्र, साहित्य आणि लोककला, विशेष व्यक्तींवरील कार्यक्रम,सांगितिक कार्यक्रम
यामुळे घरबसल्या काम करत करत मनोरंजन होते.

 

 

बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आकाशवाणीचे ब्रीद आहे. निखळ आणि निर्भेळ मनोरंजनासोबत बहुजनांचं हित साधण्यासाठी कृषी, शिक्षण, आरोग्य, व्यापार, विज्ञान- तंत्रज्ञान, अर्थ व वाणिज्य अशा बहुविध क्षेत्रातील तज्ञांचे अनुभव आणि मार्गदर्शन मुलाखतींच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवले जातात. आकाशवाणीमुळे बहुजन कल्याणाच्या शासकीय योजना वाड्या, वस्त्या आणि दुर्गम भागांपर्यंत सहज पोहोचतात. म्हणूनच आजही आकाशवाणी हे लोककल्याणकारी माहितीचे सार्वत्रिकरण करणारे प्रभावी माध्यम आहे. देशाची एकात्मता आणि अखंडता अबाधित राखणे, सामाजिक सलोखा प्रस्थापित करणे, संवैधानिक मूल्यांची जोपासना करणे आणि श्रोत्यांच्या आवडी- निवडी आणि व्यापक जनहित लक्षात घेऊन कार्यक्रमांची निर्मिती करणे हे आकाशवाणीचे कार्य यापुढेही सुरूच राहील.

सुजित बनसोडे ( प्रसारण अधिकारी )

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group