मार्डी : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे तलावात पाणी पिण्यास गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा पाय घसरून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.त्या शेतात जळण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, अशी प्राथमिक माहिती आहे.
तहान लागल्याने मार्डी येथील सदाशिव जगताप यांच्या शेतातील शेततळ्यात पाणी पिण्यास गेले असता ही घटना घडली आहे. सानिका सोनार अंदाजे (वय १७), पुजा सोनार अंदाजे (वय १३), आकांक्षा युवराज वडजे (वय ११) या तीन मुली मरण पावले आहेत. या घटनेने सोनार आणि वडजे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






