ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तृणमूल प्रमुखांच वर्तन राज्याच्या संस्कृतीच्या विरोधात, पश्चिम बंगालच्या विरोधीपक्ष नेत्याने केला “त्या क्षणाचा” व्हिडीयो शेयर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते, शुभेंदू अधिकारी यांनी बुधवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर “प्रोटोकॉल उल्लंघन” केल्याबद्दल टीका केली आहे. कारण त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राज्यपालांचे स्वागत केले नाही आणि ते म्हणाले की तृणमूल प्रमुखांच वर्तन राज्याच्या संस्कृतीच्या विरोधात आहे.

या कार्यक्रमा वेळचा राज्यपाल जगदीप धनखड यांच्या आगमनाचा व्हिडीओ शेअर करताना, शुभेंदू अधिकारी यांनी ट्विट केले, “मुख्यमंत्र्यांकडून अपमानास्पद वर्तन, प्रोटोकॉलचे उल्लंघन. प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात माननीय राज्यपालांचे स्वागत झाले नाही. परंतु त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत चालत जाऊन अभिवादन करत मोठेपणा दाखवला. त्यांचे वर्तन पश्चिम बंगालच्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे.”

भाजप नेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राज्यपाल कार्यक्रमाला आल्याचे आणि अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करताना दिसत आहे. मात्र, मुख्यमंत्री त्यांना अभिवादन करताना दिसले नाही. राज्यपाल पुढे जात असताना ते अभिवादन करण्यासाठी ममता यांच्याकडे जाताना दिसतात.

“मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाची इतकी बदनामी या पूर्वी झाली नव्हती. या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जींकडून प्रोटोकॉलची अवहेलना केली गेली आहे. हे अभूतपूर्व कृत्य आहे. माननीय राज्यपाल कठोर प्रश्न विचारत आहेत म्हणून आहे का ?” असा सवाल शुभेंदू अधिकारी यांनी आपल्या ट्वि टमधून केला आहे.

विशेष म्हणजे, राजधानी कोलकाता येथील रेड रोड येथे आयोजित प्रजा सत्ताकदिनाच्या सोहळ्यासाठी शुभेंदू अधिकारी यांना राज्य सरकारने आमंत्रित केले नव्हते. राज्य सरकारने जाहीर केलेल्या निमंत्रितांच्या यादीतून शुभेंदू अधिकारी यांचे नाव या कार्यक्रमासाठी वगळण्यात आले. राज्यात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेत्याला निमंत्रित न करण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!