---Advertisement---

चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांचे कार्य चांगले : बापूराव पाटील,मुरूम येथे निवडीनिमित्त सत्कार

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट तालुक्यात सरपंच उमेश पाटील यांचे कार्य चांगले आहे त्यामुळे त्यांच्या गावात जनतेने त्यांना भरपूर सहकार्य करत गाव ताब्यात दिले आहे, असे प्रतिपादन मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबुराव पाटील यांनी केले.

मुरूम (ता.उमरगा) येथे उमेश पाटील यांची चपळगावच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.सरपंच उमेश पाटील यांच्यासारखी माणसे राजकारणात येणे गरजेचे आहे.त्याशिवाय विकास होणार नाही. त्यांच्यामुळे चपळगाव परिसराचा सर्वांगीण विकास होईल याचा आम्हाला विश्वास आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले. सत्काराला उत्तर देताना उमेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी त्यांनी चपळगाव येथील जनतेचे आभार मानत त्यांनी टाकलेली जबाबदारी आणि विश्वास सार्थ ठरवू, असे सांगितले. याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते शरण पाटील, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, मुरूम विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दत्तामामा चटगे, आप्पासाहेब पाटील, महेश पाटील, आप्पासाहेब भंगे आदी मान्यवर
उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!