ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त समर्थ नगर विसावा कट्टा येथे विविध कार्यक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथीनिमित्त जेऊर रोडवरील श्री स्वामी समर्थ विसावा पादुका स्थान सेवा मंडळ समर्थनगर अक्कलकोट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना २९ एप्रिलपासून प्रारंभ झाला असून ५ मे पर्यंत हे कार्यक्रम चालणार असल्याची माहिती सेवा मंडळाने दिली आहे.

दररोज नामस्मरण ,पारायण तसेच रोज सायंकाळी ४ वाजता विविध भजनी मंडळांचे भजन , सायंकाळी ६ वाजता नामांकित प्रवचनकारांचे प्रवचन व भक्तीसंगीत इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.यात ३० एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता ह.भ.प संजय महाराज पाटील यांचे संत महिमा,१ मे रोजी डॉ.गुरुलिंगप्पा धबाले यांचे बसवेश्वरांचे समाजातील कार्य,२ मे रोजी डॉ. भीमाशंकर बिराजदार यांचे नाम महिमा, ३ मे रोजी ह.भ.प विठ्ठल माने महाराज यांचे अध्यात्माचे रहस्य तर ५ मे रोजी ह.भ.प विरपाक्षप्पा वैरागकर महाराज यांचे प्रसादाचे महत्त्व या विषयावर प्रवचन कार्यक्रम होणार आहे तर शनिवार दि. ४ मे रोजी लातूरच्या प्राध्यापक उमेश मोहिते व सहकाऱ्यांचा भक्ती गीतांवर आधारित विशेष भक्ती संगीताचा कार्यक्रम सायंकाळी  ६ वाजता होणार आहे.६ मे रोजी सोमवारी पहाटे ५ वाजता श्रींच्या मुर्तीस रुद्राभिषेक , सकाळी ९ वाजता महाआरती व सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले आहे.तरी सर्व स्वामी भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री स्वामी समर्थ पादुका विसावा स्थान भक्तमंडळी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!