---Advertisement---

पंतप्रधान मोदींच्या पाठोपाठ ठाकरेंची तोफ सोलापुरात धडाडणार

By team
On: April 29, 2024 2:06 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुक सुरु असून त्यासाठी सोलापूर जिल्हा राजकीय मैदानात तापायला लागला असून सोलापूर मतदारसंघातील निवडणूक ही अतिशय लक्षवेधी ठरत असून जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडताना दिसून येत आहेत. सोमवारी महाविकास आघाडीच्या सोलापूर मतदारसंघातील उमेदवार ‘प्रणिती सुशिलकुमार शिंदे’ यांच्या प्रचारार्थ सोलापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एक जंगी जाहीर सभा होणार आहे.

दरम्यान, प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याही जाहीर सभांचा धडाका सोलापूर मतदारसंघात सुरू करण्यात आला आहे. राहुल गांधी, शरद पवार यांच्यापाठोपाठ आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीदेखील जाहीर सभा पार पडणार आहे. ही सभा आज दिनांक: २९ एप्रिल, २०२४; सोमवार रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता कर्णिक नगर येथील ‘चिल्ड्रेन्स गार्डन’ मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

सदर सभेला सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी; सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.

यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, उपनेते शरद कोळी, अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, अनिल दासरी, गणेश वानकर यांच्यासह काँग्रेसचे निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, शहर जिल्हाध्यक्ष चेतन नरोटे, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.नंदकुमार पवार, आदी पदाधिकारी तसेच; हजारो कार्यकर्ते सदरील सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!