अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशाला व श्री गुरूशांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले. प्रारंभी माजी नगरसेवक सिद्धाराम येगदी, डॉ.उदय म्हेत्रे, डाॅ. मंजुनाथ पाटील, प्राचार्य बसवराज हिरतोट यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी स्व. म्हेत्रे यांच्या कार्याला उजाळा देत मनोगत व्यक्त केले.
यावेळी सर्वरोग निदान आरोग्य तपासणी करण्यात आली.संस्थेचे सचिव प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. मोफत औषध उपचार करण्यात आले. आरोग्य विभाग सोलापूर व डिजिटल ग्रामीण सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवा यासाठी चारशे विद्यार्थ्यांना हेल्थ कार्ड काढून देण्यात आले. त्या व्यतिरिक्त आयुष्यमान भारत, ई-श्रम कार्डं योजना, लायसन्स, सारथी, ई आरोग्य विमा योजनेची माहिती देण्यात आली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.मंजुनाथ पाटील, आरोग्य सहायक आर.पी.जाधव, आरोग्य सेवक राजेंद्र चौगुले, आरोग्य सेवक जयकुमार नाटकर, वसिम शेख, अजित राठोड़ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.