अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे हनुमान जयंती निमित्त गौडगाव बु येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.११ एप्रिल रोजी मल्लिकार्जुन भजनी मंडळाकडून जागरण व भजन संध्या कार्यक्रम होणार आहे.शनिवार दि.एप्रिल रोजी पहाटे ३ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम होमहवन, गजलक्ष्मी पूजा,पानपूजा, यज्ञ नवग्रह पूजा, विशेष अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी ६ वाजता हनुमान जन्मोत्सव पाळणा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. यावेळी गौडगाव बु चे मुस्लिम भक्त निसार शेख यांच्याकडून हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
सकाळी विविध वाद्यवृंदसहित पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. निसार शेख व इतर अनेक भक्तांकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. रविवार दि.१३ रोजी हरदेशी नागेशी (हाडेक्कि) सवाल जबाब कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४ वाजता परिसरात जंगी कुस्त्यांचे आयोजन केले आहे. रात्री ८ वाजता नयनरम्य शोभेचे दारूकाम करण्यात येणार आहे. शनिवार व हनुमान जयंती एकाच दिवशी आल्याने भक्तांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीने दर्शन व महाप्रसाद याचे सूक्ष्म नियोजन केले आहे.दर्शन, महाप्रसाद, थंड पिण्याचे पाणी, विद्युत सुविधा, पोलिस बंदोबस्त, आरोग्य सेवा, सोलापूर ब्लड बँक कडून रक्तदान शिबीर इत्यादी बाबत नियोजन केल्याचे ट्रस्टीने कळवले आहे.