---Advertisement---

वाशीत 80 कोटींची चांदी जप्त, पोलिसांना बसला धक्का

By team
On: November 16, 2024 7:45 PM
Follow Us:
---Advertisement---

वाशी वृत्तसंस्था 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक तोंडावर येऊन ठेपली असताना पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकांकडून राज्यभरात कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी रोकड रक्कम, सोने, चांदी आणि दारुचा साठाही जप्त करण्यात आला आहे. मतदानाच्या चार दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. एका ट्रकमधून 8,476 किलो चांदी जात होती. त्याची किंमत तब्बल 80 कोटी रुपये आहे. इतक्या मोठ्या रक्कमेची चांदी पाहून पोलिसांना धक्का बसला आहे. ही चांदी जप्त करण्यात आली आहे.

मानखुर्द पोलीस वाशी चेकनाक्यावर वाहनांची तपासणी करत आहे. या तपासणी दरम्यान शुक्रवारी रात्री एका वाहनाची तपासणी करण्यात आली. या मोठ्या ट्रकमध्ये पोलिसांना चांदी मिळाली. मोठ्या प्रमाणावर चांदी पाहून पोलिसांना धक्का बसला. या चांदीचे वजन करण्यात आले. 8,476 किलोग्राम ही चांदी भरली. त्या चांदीची बाजारातील किंमत 80 कोटी रुपये आहे.

अधिकाऱ्यांनी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या टीमला घटनास्थळी बोलवले. आता आयकर विभागाचे अधिकारी या चांदीच्या मालकाचा शोध घेत आहेत. सुरुवातीच्या चौकशीत ही चांदी बेकायदेशीरपणे घेऊन जात असल्याचे समोर आले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!