ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विजय वडेट्टीवारांना शंभर जन्म घ्यावे लागतील ; मंत्री नितेश राणेंचे टीकास्त्र !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात नुकतेच नव्या वादाला तोंड फुटले आहे. विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान केल्याचा व त्याविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी त्यांना घडलेली हकीकत याविषयी चर्चा केली. जगद्गुरूश्री यांनी हिंदुत्व जागृत करून हिंदूंना साथ देणार्‍या उमेदवारास मतदान करण्याचे आवाहन साधू-संतांनी केले होते. त्यामुळे युती सरकार सत्तेवर आले असल्याचे ते म्हणाले होते. त्यावर वडेट्टीवार यांनी नरेेंद्राचार्यजी महाराजांचा एकेरी उल्लेख करीत अवमानकारक भाषा वापरली होती. स्वस्वरूप संप्रदायाचे भक्तगण त्यावर राज्यभर निषेध करत वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजींची माफी मागावी, अशी मागणी करीत आहेत. यावर आता मंत्री नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

त्यावर मंत्री राणे म्हणाले की, काँग्रेस हा हिंदूद्वेष्टा पक्ष आहे. हा पक्ष मुस्लिम लीगची बी टीम आहे. ते आपल्या साधू-संताना मान देणार नाहीत. प्रयागराजला कुंभमेळा सुरू आहे. तिथे राहुल गांधी वा त्यांचे नेते तिथे स्नानाला गेलेले नाहीत. मुस्लिम लीगच्या विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे. त्यांच्याकडून कसली अपेक्षा करता? शेवटी त्यांना त्यांच्या दिल्लीमध्ये बसलेल्या नेत्याला खूष करायचे असते.

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे जे कार्य आहे हे कधीतरी वडेट्टीवार यांनी नाणीजमध्ये जाऊन पाहावे. तेवढे काम उभे करायला त्याला शंभर जन्म घ्यावे लागतील. हे त्यांच्या क्षमतेच्या बाहेरचे आहे. राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे. त्यामुळे या प्रश्नांवर आमचे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, असे ना. नितेश राणे म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!