अक्कलकोट, दि.२८ : सोलापूर शहरात डफरीन चौक परिसरात प्रथमच एम प्लस एम डॉल्फिन फार्मसी या चोवीस तास सेवा देणाऱ्या अद्ययावत फार्मसीचा शुभारंभ अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे,एमएसपीसीचे अध्यक्ष विजय पाटील,राष्ट्रवादीचे नेते संतोष पवार,महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्र अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे (पश्चिम विभाग)
निमंत्रित सदस्य गंगाधर कापसे,सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट्र अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बसवराज मणूरे,सचिव राजशेखर बारोळे, खजिनदार राजेश विरपे,उस्मानाबादचे अध्यक्ष धनाजी आनंदे,सोलापूर शहराध्यक्ष सिद्धाराम चाबुकस्वार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत फार्मसीचे प्रमुख सिद्धेश्वर घाळे यांनी केले.सोलापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी अद्ययावत फार्मसी उभे राहिल्याने रुग्णांना चांगली सेवा मिळू शकेल,असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.यावेळी सर्व मान्यवरांनी डॉल्फिन फार्मसीच्या शुभारंभ निमित्त घाळे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी कय्युम इनामदार,सुरेश भगत,मनोज काटगाव,सुधीर राऊत,अभिजित गाढवे,प्रशांत खलीपे,राजन ठक्कर,राहुल काळे,गुरुदास सांगाडे,परेश कोठारी ,नागेश चौधरी,दिलीप कारंडे,वाले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
२४ तास सेवा
राहणार
पेशंट कौन्सिलिंग करण्याबरोबरच डॉल्फिन फार्मसी चोवीस तास सेवेत उपलब्ध राहणार आहे.सोलापूर शहर तसेच जिल्ह्यातील सर्व रुग्णांसाठी एक चांगली सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे.
सिद्धेश्वर घाळे,प्रमुख डॉल्फिन फार्मसी
सोलापूर