मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आतापासूनच रणनीती (BJP Mumbai President) आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ते पक्षात काही बदल करणार आहेत. काही महत्वाच्या नेत्यावर मोठी जबाबदारी पक्षाकडून सोपवली जाऊ शकते.
मुंबईमध्ये पार पडणार बैठक
मुंबईतील सर्व आमदारांची आणि जिल्हाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडत आहे. ही बैठक भाजपच्या मुंबई कार्यालयात सुरू असून, यात भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश, राज्याचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ही बैठक अत्यंत निर्णायक मानली जात आहे.
या बैठकीदरम्यान, मुंबई भाजप संघटनेत लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते प्रविण दरेकर यांचे नाव चर्चेत आहे. सध्या आशिष शेलार हे मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत, मात्र आगामी महापालिका निवडणुकीसाठी संघटनेत नवसंजीवनी देण्यासाठी नेतृत्वात बदल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कशी आहे प्रवीण दरेकरांची राजकीय कारकीर्द?
राज ठाकरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी चळवळीतून राजकीय प्रवासाला सुरुवात
मनसेचा आक्रमक चेहरा, प्रमुख नेत्यांमध्ये समावेश
2009 ते 2014 मध्ये मनसेच्या तिकीटावर विधानसभेत
2015 मध्ये भाजपात प्रवेश
2016 मध्ये भाजपकडून विधनपरिषदेवर निवड
मुंबई जिल्हा बँकेत झालेल्या 123 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप
सध्या विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत
देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख