ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धक्कादायक पुरावे देणार ; अंजली दमानिया उद्या करणार गोप्य्स्फोट !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्ह्यात झालेल्या खून प्रकरण चांगलेच तापले आहे तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच लावून धरलं आहे. याचसंदर्भात त्यांनी एक सूचक ट्विट केलेलं आहे.

अंजली दमानिया या उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. हे सगळे पुरावे अतिशय धक्कादायक आहेत, ते उद्या जनतेपुढे येतील, त्यानंतर नक्कीच मोठा निर्णय घ्यायला जनता सरकारला भाग पाडेल, असा विश्वास अजंली दमानिया यांनी व्यक्त केला. काल देशमुख कुटुंबियांनी महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली यावरही अंजली दमानिया यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, काल देशमुख कुटुंबियांनी महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली यावेळी वैभवी देशमुखने तिची बाजू मांडली.

मात्र त्यानंतर, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असे नामदेव शास्त्री आता म्हणत आहेत. त्यावरही दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली. सुरूवातीलच काही वाक्यात ते म्हणाले की मी धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिले, त्यांचं अंत:करण बघितलं, पण वैभवीचे डोळे कोण पाहणार, तिच्या डोळ्यातलं पाणी कोण बघणारं , तिचा आधार जन्मभरासाठी निघून गेला आहे. फक्त राजकारणासाठी त्यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला, ते मला अतिशय चुकीचं वाटलं अशी टीका दमानिया यांनी केली. तसं व्हायला नको होतं, असं म्हणत अंजली दमानिया यांनी खंत व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!