---Advertisement---

राज्यातील दुकानांच्या वेळ चार तासांनी वाढणार? काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाचा सविस्तर

Follow Us:
---Advertisement---

सांगली : राज्यातील दुकानांच्या वेळा रात्री ८ वाजेपर्यंत वाढवण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली येथे केली.सांगली येथील पूरग्रस्‍त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली. त्याबरोबर यासंदर्भात आजच आदेश निर्गमित करण्यात येणार आहे असे ही सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्याच ठिकाणी दुकानांच्या वेळा वाढवून मिळतील, असेही त्यांनी नमूद केले.

कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भातील जीआर आज संध्याकाळी निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सध्या राज्यात सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाकडून वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!