---Advertisement---

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे

By team
On: April 9, 2024 4:32 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

जनसामान्यांचा एकच निर्धार आहे तो म्हणजे सध्या अब की बार चारशे पार.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अक्कलकोट शहरातील मतदारांनी सज्ज व्हावे,असे आवाहन माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांनी केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील विविध बूथना भेटी दिल्या.यावेळी ते बोलत होते.यामध्ये बुथ क्रमांक-१५२,१५५,१५६,१५७,१५८,१५९,१६०,१६१, १६२,१६३,१६४,१६५ येथे भेटी देत लोकसभेच्या अनुषंगाने सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच ते करत असलेल्या कार्याचा आढावा घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला सोलापूर जिल्हा विकासाचा नवा आयाम गाठत आहे.त्यामुळे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राम सातपुते यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन कार्य करावे,असे आवाहन मिलन कल्याणशेट्टी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशासह सोलापूरचा विकास होत आहे.विकासाचा हा रथ अधिक गतिमान होण्यासाठी पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येणे खूप गरजेचे आहे.त्या दृष्टीने आम्ही अक्कलकोट शहरामध्ये मोठे मताधिक्य देण्याचा प्रयत्न करत आहोत,असे शहराध्यक्ष शिवशरण जोजन यांनी सांगितले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी,उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,माजी नगरसेवक महेश हिंडोळे, माजी नगरसेवक बाळा शिंदे,जेष्ठ नेते रमेश कापसे,दयानंद बिडवे,अंकुश चौगुले,नन्नू कोरबू,सिद्धू माळी,आतिष पवार ,मोहसीन बागवान,लखन झंपले यांच्यासह पदाधिकारी आणि बूथप्रमुख,शक्तीकेंद्रप्रमुख,कार्यकर्ते उपस्थित होते.

विजयाचा संकल्प
आम्ही अक्कलकोट शहरातून संकल्प करुन आमदार राम सातपुते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची गुढी साकारण्याकरिता संपूर्ण शहरातील बूथ मिटींग आयोजित करुन मार्गदर्शन करुन यादी वाचन व यादी वाटप करत आहोत.यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत आहेत.
– महेश हिंडोळे,जेष्ठ नेते

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!