---Advertisement---

झिशान सिद्दीकींनी घेतली फडणवीसांची भेट, केली मोठी मागणी

By team
On: October 18, 2024 4:01 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था

काही दिवसांपूर्वी अजित पवार गटात दाखल झालेले बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या झाली. ही हत्या लॉरेन्स बिश्नोई गँगने केल्याचा दावा करण्यात येत आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आज त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल झाला. त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

थोड्या वेळापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तो भेट घेणार आहे. तर त्याचवेळी कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या दाव्यासाठी राणे सुद्धा सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल हे पण फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत.

झिशान सिद्दीकी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीत, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसंबंधीच्या तपासाची इत्यंभूत माहिती देण्यात आल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाची धागेदोर कुठंपर्यंत आहेत, याविषयी उहापोह झाल्याचे समजते. दरम्यान झिशान यांनी याप्रकरणात न्याय देण्याची विनंती केल्याची माहिती समोर येत आहे. सलमान खानचे जवळचे मित्र असल्याने बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचा दावा बिश्नोई गँगशी संबंधित काही जणांनी समाज माध्यमांवर केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!